Monday, 26 November 2012

२६/११ ची पार्श्वभूमी DSLR च्या वैचारिक Zoom लेन्स मधून.

काल दुपारी २६/११ च्या स्मारकाचा फोटो काढायला गेलो होतो. तीन AK-४७ सज्ज पोलीस हवालदार तिकडे उभे होते. त्यांना विचारून स्मारकाचा फोटो काढला. मला थोडा अजून क्लोजप फ्रेम फोटो हवा होता, त्या मुळे मी त्यांना विचारून थोडा जवळ गेलो आणि लेन्स फोकस केली; तसं त्यांच्यामधल्या एकाने विचारले झूम लेन्स नाही का ? मी म्हणालो सध्या एकच आहे.
पण तिकडून  निघताना मला तो प्रश्न एका वेगळ्याच वैचारिक View Finder मध्ये घेऊन गेला.... त्या पोलिसांना कदाचित असे म्हणायचे होते का ? की आमची ड्युटी आणि कर्तव्य पाहतांना थोडं आमच्या परिस्थितीकडे  ZOOM करून पहा.. २४ -२४ तास ड्युटी, मानसिक अशांतता, बदल्या अशा अनेक गोष्टीमधून स्वताला सावरत असताना चिरीमिरी घेऊन घर चालवणारा आणि तरीही मुंबईचे जीवन दिवसरात्र सुरक्षित ठेवणारा तो पोलीस कोण तर पांडू ?

४ वर्षापूर्वी जो अतिरेकी उच्छाद मांडला गेला होता त्या वेळी हा पांडूच त्याचा दांडू घेऊन धावला होता . कसाबला पकडल्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चा आणि प्रतीचर्चा सगळ्यांचे फड रंगले होते. आता "फड " शब्द मुद्दामून वापरला कारण या सर्व गोष्टी म्हणजे TRP कमवायचा तमाशाच. दर वर्षी २६ /११ जवळ आली की, चर्चा रंगणार. आता कसाबला फाशी दिल्यावर पुन्हा चर्चा सरकारचे कौतुक करायचे की उशीरा शिक्षा दिली म्हणून सुस्कार सोडत बोटं मोडायची. आपल्याला फक्त स्मारक बांधायचा छंद. शहिदांची कुटुंब राहिली बाजूला. फायर ब्रिगेडच्या जवानांना पदके आणि बक्षिसे जाहीर केली होती पण परवाच TV वर दाखवलं  की अजून लाल फीत काही सुटली नाही.
काल रविवारी पाणी कपात म्हणून मुंबईकर रविवारी सकाळी लवकर उठले होते आणि दुपारी आणि संध्याकाळी आराम करत होते, पण कोणाला माहित २६/११ च्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि गुप्तहेर खाते युद्धपातळीवर काम करत होते. पण पण पडद्यामागचे कलाकार कॅमेरा समोर कधी येत नाहीत.

खरे तर बाळासाहेब गेल्यावर ऐन दिवाळीत शोकसागरात बुडालेल्या मुंबईने काल रविवारी तुलसीविवाहानिमित्त कंदील आणि पुन्हा रोषणाई केली होती. पण ज्या कुटुंबीयांनी २६/११ भोगले होते ते काय करत असतील ??
एकूण काय तर आपले आयुष्य DSLR आहे जणू पण कॅमेराच्या केस मध्ये वेगवेळ्या लेन्स बरोबर ठेवाव्यात आणि योग्य वेळी योग्य लेन्स लावली तरच  तो फोटो योग्य Angle मध्ये आणि परफेक्ट Exposure मिळते . फक्त मुद्दा एकाच उरतो तो फोटोग्राफर कोण आहे?

Monday, 15 October 2012

काक मेळावा: सर्वपित्री अमावस्या!

संध्याकाळची वेळ, दिवस सरतोय तसे कॉलनीमधले जुनाट पिंपळावर कावळ्यांचा पितृ वार्षिक संमेलन भरण्याची तयारी चालू होती. आजचा दिवस म्हणजे, कावळ्यांचा सन्मान करायचा ... ज्या आई वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्रास दिला त्यांची पूजा करायचा.... हेतु ? फक्त स्वार्थभाव ... अर्थात पितरांचा आपल्याला त्रास होऊ न देणे.


सगळे पूर्वज जमले होते सभेला, पोट मात्र गच्च भरले होते. आपल्या मुलांना - नातवांना पाहून, त्यांचा संसार पाहून आले होते सगळे. मेळावा सुरु झाला, काव...काव.. काव.. एकच कल्ला! सर्व खुश होते तर त्यातला एक अस्वस्थ बसला होता.

सगळ्यांनी त्याला विचारले, का रे बाबा काय झाले तुला ? तू का इतका दु:खी ? तर तो कावळा ढसा ढसा रडू लागला तसा पिंपळाचा पार अचानक शांत झाला.

तो बोलू लागला.. माझ्या नातवाने मला नैवेद्य दाखवला, त्याला पाहून बरे वाटले पण त्याचे संभाषण ऐकून फार वाईट वाटले; मागून त्याची आई ओरडत आली, " अरे पिंट्या जेवण गार होतंय सिलेंडर महाग झालेत! परवडत नाही, किती वेळ फोन वर बोलतोयस ? म्हणे नेट फ्रेंड ! आग लाव त्या फेसबुक ला... कॉम्पुटर बंद कर आधी आणि जेवायला ये. पिंट्या चरफडत जेवायला आला. कावळोजीराव पुढे सांगत होते, म्हणे नातवाला डॉक्टर बनायचे आहे, पण शिक्षणाला पैसे कुठून आणणार? आपल्या काळात खूप स्वस्ताई होती.. आता तर हाहाकार माजलाय! मुलाच्या नोकरीत घर चालत नाही, मोठी नात लग्नाची आहे.. तिच्या लग्नासाठी कर्ज काढले तर नातू डॉक्टर नाही बनणार, माझा मुलगा सारखा चिंतेत असतो आणि माझी सून संसाराचा गाडा कशी चालवते तिचे तिलाच माहित.

आता मात्र सगळेच शांत झाले. काय करणार ? खरे तर सगळ्याच घरात तीच परिस्थिती होती.

तसा दुसरा कावळा बोलू लागला, अहो काय सांगू राव... आम्ही एकत्र कुटुंब ७ जण १५ X १० च्या खोलीत आनंदात राहायचो, आता मुलांची लग्न झाली, खाणारी तोंड वाढली आणि त्यावर राहायला जागा पण नाही. तेंव्हाच थोडे धाडस करून जागा घेऊन ठेवली असती तर चीज झाले असते, आता तर पै पै साठवून घर घेण्यासाठी धडपड करावी लागतेय, स्वताला विकले तरी आता घर परवडणार नाही. अशा परीस्थितत मुलगा लग्नाचा असला तर अजूनच चिंता! मुलींच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यात, लग्नासाठी दागिने करायचे म्हणजे सोनं जमवायला पाहिजे, ते तर आता शक्य नाही, आधीपासूनच सोनं जमवून ठेवायला पाहिजे होत. मोठा नातू, त्याचे लग्न झालेय मला पणतू सुद्धा आहे, पण गेल्या आठवड्यात त्याला कामावरून नोटीस आलीये, दुसरी नोकरी शोधण्यासाठी, आता सांगा राव, इतकी वर्ष नोकरी करून सिनियर मेनेजर पदावर असलेल्या मुलाला अचानक अशी नोटीस आली तर काय करायचे हो ? त्याचा संसार हा संसार नाही का?

तिसरा कावळा म्हणाला: माझा मुलगा तर डॉक्टर आहे, त्याचे सर्व आलबेल आहे, पण त्याच्या कडे येणारे पेशंट पाहता डोक चक्रावून जाईल, त्यांना गरोदर पेशंट म्हणावे की मेंटल पेशंट काही कळत नाही. मुलगी होणार की मुलगा ते पहायचे असते त्यांना, म्हणे समाजात नाचक्की होते मुलगी झाली तर ! काय म्हणावे अशांना कळत नाही.

तितक्यात एक सुज्ञ कावळा पुढे आला, कदाचित समाज प्रबोधन चळवळीतील माजी कार्यकर्ता असावा तो, तो बोलू लागला, " मित्र हो, आपलेच चुकले का कदाचित? या सर्व गोष्टी काही अचानक नाही निर्माण झाल्या, आपल्या पिढी पासूनच या गोष्टी मोठ्या झाल्या, आपणच खत पाणी घातले या सगळ्याला."

यावर एक कावळा म्हणाला असे कसे शक्य आहे ? आम्ही तर या सगळ्याच्या विरोधात होतो.. आमच्या पण घरी हेच सर्व आम्ही पण भोगले होते!

सुज्ञ कावळा: अहो तेच तर म्हणतोय... आपण फक्त भोगले, त्यचा प्रतिकार केला का ? फक्त राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडली, त्या पलीकडे काय केले ? आज हेच सर्व अराजक बनून डोक्यावर नाचतायत. आपण तर सुटलो, आपल्यात कितीतरी कर्जबाजारी शेतकरी बंधू असतील, घर खर्च भागत नाही असेही काही निराश असतील, पण आपल्या कुटुंबीयांनी काय करायचे, की त्यांनी पण जीवन संपवायचे?

पूर्वी आपल्या चालण्यासाठी आधाराच्या काठीला सोन्याची मुठ असायची, आता दागिने सुद्धा सोन्याचे पाणी चढवलेले ! आपल्याला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, ते सुद्धा कावळा बनल्यावर.... आपण सोने अगोदर पासून जमवायला हवे होते, तेव्हा जागेचे भाव सुद्धा फार नव्हते.

आणि मुलगी नको तर काय घराचा वंश वाढवायला मुलगा कोण जन्माला घालणार? आपण विज्ञानाचा पुरस्कार कधीच केला नाही.

महागाई, भ्रष्टाचार हे सर्व आपल्या डोळ्यादेखत मोठे झाले, पण आपण काहीच केले नाही, आपला कार्यभाग साधुन घेतला की झाले; हीच आपली वृत्ती!

तुमच्या घराला स्वतःचे घर समजून, सांभाळणारी मुलगी जेंव्हा लग्न होऊन येते तेंव्हा हुंडा का मागता? आणि तिला त्रास का देता? तुमच्या पोरात धमक नाही तिला सांभाळायची तर लग्न का केलं ? आणि म्हणे हुंडाबळी.

न्याय व्यवस्था आणि कायदा अजून इंग्रजांच्या काळातला आहे, तो बदलण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे होता.

सगळ्यांना ते तंतोतंत पटले, त्यांनी खंत व्यक्त केली.

तो सुज्ञ कावला म्हणालाअसो आता झाले ते झाले, आपण तर कावळे झालो, त्यांना जगू दे त्यांच्या प्रमाणे, फक्त छोटीशीच आशा बाळगू की, ही नवीन पिढी, योग्य वेळीच योग्य दिशेने विचार करेल.

आणि आता आपली निघायची वेळ झाली, या कावळ्याचा देह फक्त आजच्या दिवसापुरता मिळाला होता... तो सुज्ञ कावळा म्हणाला. थोड्या वेळात सगळे कावळे उडून गेले. आणि तो पिंपळ पुन्हा रिकामा झाला.

Sunday, 14 October 2012

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली.

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली. दिवसभर प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाने बऱ्याच कथा (Documentaries) दाखवल्या. त्या युद्धात आपण हरलो कारण कमी प्रतीची व जुनी हत्यारे वापरली गेली तसेच आपल्या संरक्षण मंत्रालयाची काही पावले चुकीची पडली.

विषय असा आहे त्या ५० वर्षानंतर जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारे आपण आज कुठे आहोत ?

त्या युद्धात सुद्धा आपले जवान शर्थीने लढले होते, आणि अजूनही आपल्या जवानांमध्ये ती देशभक्ती कायम आहे. फक्त वाईट एवढेच वाटते की शस्त्रे अजूनही आधुनिक नाहीत.
Short Range, Mid Range आणि Long Range अशा वेगवेगळ्या Assault  Rifles तसेच आधुनिक Bullet Proof Jackets आज आहेत पण आपल्या सुरक्षायंत्रणेकडे काहीच नाही. LOC वरचे जवान असोत किंवा मुंबई शहरात २४ तास ऑन ड्युटी असणारे पोलीस असोत. 

आपण अजूनही ठेच लागल्याशिवाय सुधारत नाहीत. आणि सुधारण्याची गती सुद्धा तितकीच वाखाणण्याजोगी... कारगिल युद्धात वापरलेल्या बोफोर्स तोफांचा खरेदी घोटाळा अजून सुटलाच नाहीये आणि रशियाच्या भंगारातून विकत घेतलेली आणि अंदाजे १२,००० करोड रुपये खर्चून आणि तीसुद्धा वेळेवर म्हणजेच २००९ सालात Commisson न केल्यामुळे रशियाला ५% म्हणजे ५०० करोड दंड आकारून, अजून "INS VIKRAMADITYA " (पूर्वश्रमीची Admiral Gorshkov )  १००% दुरुस्त करून आता आपल्याला २०१३ साली मिळणार आहे. आणि हा अजून एक संरक्षण महाघोटाळा बनून समोर येण्याची भीती वाटते.

आज चीन बंगालच्या उपसागरात पाय रोवतेय, अरबी समुद्रात तर त्यांच्या आण्विक पाणबुड्या ऑलरेडी फिरतायत आणि आता Aircraft Carriers त्यांच्या ताफ्यात भरती करण्याचा सपाटाच लावलाय.
आपल्या नंतर चीन ने रशियाला order देऊन त्यांची Aircraft Carrier Commisson करून घेतली, आणि आपण अजून वाटच पाहत बसलोय.

एक काय ते "Brahmos Atomic Capable Long Range Ballistic Missile"  बनवल्यामुळे म्हणे चीन च्या पोटात गोळा आलाय. एवढ्यावरच खुश आहोत आपण.
अमेरिकेबरोबर केलेला JAF - F35 चा करार पूर्णत्वास यायला अजून बराच वेळ आहे. एकाच "INS AARIHANT " बनवली आहे, आणि तिचा उदो उदो करत बसलोय..

गेल्या काही वर्षापूर्वी बातमी वाचली होती की, IAF ची एक Secret File गटारात सापडली होती. Secret Documents किती सुरक्षित आहेत तो वेगळा मुद्धा,पण आपण World War ३(Cyber War ) जे ऑलरेडी चालू झाले आहे, त्यात आपण सुद्धा ओढले जातोय. चीनी आपल्या कितीतरी Web Sites Hack करतायत, आणि या चीनी hackers नी संपूर्ण जगभर दहशत निर्माण केली आहे. 
भारतात ३G आणि ४ G तंत्रज्ञान आले आहे, WiFi  Hub बनू पाहणाऱ्या मुंबई-पुणे-बंगलोर-चेन्नई अशा शहरात किती Network सुरक्षित आहे कोण जाणे? मोबाईल वर सगळी कामे करणारी हाय टेक पिढी या सर्व धोक्यापासून खूप अनभिज्ञ आहे.

इतके सर्व असून आपण फक्त, महागाई- घोटाळे-लैंगिक अत्याचार- आतंकवाद - स्त्री भ्रूण हत्या- भ्रष्टचार - बेरोजगारी-शेतकरी आत्महत्या- रिसेशन - संसाराचे गाडे - चूल-मुल - बायको -घर- प्रेयसी- मित्र - पार्टी हेच करतोय .

आपण तिरंग्यातले ते तीन रंग- ते अशोक चक्र तो सम्राट अशोक, शिवाजी महाराजांनी रुजवलेली गानिमिकावे- भारताचे पहिले आरमार- आणि बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते, हे सर्व आपण विसरलोय का ?

Monday, 6 August 2012

फ्रेन्डशिप डे

फ्रेन्डशिप डे ला खूप जणांनी मेसेज केले, फोन पण आले, दुसऱ्या दिवशी एकमेक एकमेकांना विचारात होते की..." काय रे काय केलेस काल रविवारी फ्रेन्डशिप डे ला ?" मी म्हणतो ... फ्रेन्डशिप डे कॉलेज आणि शाळेत साजरे केले, आता तर या सुज्ञ वयात मैत्री साजरी करण्यापेक्षा मैत्री निभवायची वेळ आहे. SMS आणि WhatsApp फ्री आहे म्हणून शुभेच्छांचा पूर मोबाईल वर वाहतो... पण त्यातल्या किती मित्र आणि मैत्रिणीबरोबर तुम्ही नुसती मैत्री न करता निभावली सुद्धा ?

फ्रेन्डशिप डे ला पाहिलेला एक प्रसंग आठवला, एक छोटा मुलगा फ्रेन्डशिप रिबीन घेऊन चाळीत बागडत होता, त्याच्या बाबांनी त्याला दरडावले... " काय रे हे काय करतोस तू ? फ्रेन्डशिप डे आपण साजरी करत नाही, आपण रक्षाबंधन साजरी करतो, तू फ्रेन्डशिप डे साजरी करायचा नाही.... " मला त्या वडिलांना सांगावेसे वाटले की, फ्रेन्डशिप डे हा पाश्चात्य संस्कृती कडून आला असल्या मुले साजरी करायचा नाही हे योग्य नाही.... फ्रेन्डशिप डे मध्ये वाईट किवा चुकीचे ते काय ? मैत्री ही चांगलीच गोष्ट आहे ... फक्त आपला दृष्टीकोन चांगला हवा...

आपणच दृष्टीकोन बदलायला हवा नाही का ?

अरे हो ... मी विसरलोच... मैत्री निभावण्य वरून आठवले की ... .१२ तारखेला ठरवलेल्या पिकनिकला मला जाता येणार नाही आहे ... आता.. आदित्य, उत्कर्ष, गौरव, मयुरेश आणि सगळेच वैतागतील .

Thursday, 8 March 2012

स्त्रीत्व : एक अदभूत सत्व ! ( जागतिक महिला दिनानिमित्त)

तूच माता, तूच भगिनी आणि वेळेस तू पिता ही...
तूच होई सिंधुताई जगन्माता कधी अनाथांची तर कधी नवऱ्याची ही..

तूच ममतेचा पाझर, आणि तूच एक सामाजिक हक्कांचा लढा..
तूच होई मेधा पाटकर विस्थापितांची बनून आस्था ...

तूच आदर्श शिस्तप्रिय खंबीर आणि शाश्वत जगण्याचा दृष्टीकोन..
तूच होई किरण बेदी आणि तिहार जेल मधील कैद्यांचा नव दृष्टीकोन..

तूच रणरागिणी आणि तूच माता आपल्या मुलाची आणि प्रजेची
तूच वीरांगना झाशीची, आणि माता पाठीवर बांधलेल्या मुलाची

तूच सूरसम्राज्ञी स्वरलता आणि स्वरांची माता ..
तूच वैशाली सामंत .. तूच लता आणि तूच आशा.. जणू दिशा नवसंगीताची..

तूच चैतन्य क्रीडांगणातले आणि तूच स्फूर्ती क्षितीजाला गवसण्याची..
तूच सायना आणि तूच पी टी उषा क्रीडांगणातली आणि कॉर्पोरेट मधली सुद्धा..

चूल आणि मुल ..संसाराचा गाडा चालवणारीही तूच आणि लोकाल ट्रेन चालवणारीही तूच
तूच दीप्ती मोडेकर आणि सुरेखा यादवही तूच ..

तूच अवकाश भ्रमर.. आणि मंगळ आणि अमंगळ ग्रहांना गवसणी सुद्धा तूच ..
तूच ती कल्पना चावला . आणि तूच ती गीता वरदान ..

तूच संस्कार जगण्याचे आणि शौर्याच्या बाळकडूचे..
तूच जिजाऊ शिवबाची आणि तूच यशोदा नटखट कान्हाची..

तूच असे विष्णूची लक्ष्मी.. तूच असे.. राधिका कृष्णाची.. आणि वेळेस तूच होई जगदंबा आणि दुर्गा..!

Thursday, 16 February 2012

असाच हा आजचा योगायोग.. आणि मुंबई महापालिकेचे मतदान.

आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा दिवस होता, सरकारी कर्मचारी आणि बँकांमध्ये हक्काची सुट्टी, आता हक्काची सुट्टी म्हटली म्हणजे... मतदानाचा हक्क बर का. तो खरच किती जन बजावतात तोही चर्चेचा विषय आहे .. आता काय... चर्चा - चर्चा - चर्चा बसं एवढच उरले का असा प्रश्न पडतो... सगळ्या News Chennel वाल्यांना एकाच काम .. तोंडाची वाफ नेते कसे वाया घालवतात ..आणि .. प्रचारात विकत आणलेल्या बाहुल्या कशा टाळ्या वाजवतात... हेच दाखवायचे का असते कोणास ठाऊक.

कॉर्पोरेट मध्ये आणि IT मध्ये सुट्ट्या मिळणे म्हणजे जणू आठवडाभर कोणीतरी नाक दाबून ठेवले आहे आणि एक दिवस श्वास घ्यायला उसंत.. नियमाप्रमाणे कर्मचार्यांना आणि कॉर्पोरेट मध्ये बॉस च्या चाबुकाच्या धाका खाली काम करणाऱ्या EXCUTIVE गाढवांना मतदानास कामाच्या वेळेमधून मतदान करण्यासाठी सकाळी २ तास उशिराने किंवा २ तास लवकर जाण्याची मुभा दिलेली असते.

आता काही जण म्हणत असतील की तरुण पिढीला मतदान करण्यात इंटरेस्ट नसतो .. पण जर सोशल नेटवर्किंग वरच तरुण पिढी प्रतिसाद देत असेल तर ती.. मतदान करण्यासाठी सुद्धा मतदान केंद्रावर तेवढ्याच उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे रांग लावण्यास जमते..

आज सकाळी मतदान करायला केंद्रावर गेलो तेव्हा माझीच शाळा मला मतदान केंद्र म्हणून आली. तेव्हा सहज विचार येऊन गेला मनात की .. मतदान केंद्रे ही नेहमी शाळेतच का ठेवतात.. उगाच मुलांच्या शाळा दोन दिवस बुडतात. पण " शिशु वर्गात " एक काढलेले चित्र पाहून वाटले .. सुज्ञ पणे विचार केला तर लक्षात येईल, शाळा हे विद्येचे मंदिर आहे.. आपले संस्कार, आचार विचार, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपले मत मांडण्याची नैतिक पद्धत आपल्याला शाळेतच शिकवली जाते.. या सर्व गोष्टी आपण स्मरून मग सुज्ञ पणे विचारपूर्वक मत दिले पाहिजे असा त्या मागचा हेतू असावा का कदाचित ?

तसा आज घरीच होतो.. मतदान करून आल्यावर Laptop चालू केला पण पुढ्यात पडलेली " प्राण जाये पर शान न जाये" सिनेमाची सीडी दिसली .. आणि खूप दिवसांनी तो सिनेमा पहिला, त्यातली ती चाळ, तिथली वस्ती, भांडणे, प्रेम आणि बऱ्याच गमतीजमती सगळे काही ओळखीचे वाटले ... अरेरे हो ... मी पण गिरगावात एका चाळीतच राहतो की.. सार काही अगदी तसच.. अगदी "बिल्डर" नावाच्या सापांनी सुद्धा त्या सिनेमासारखा गिरगावाला विळखा घातला आहे .. हे लक्षात आले..

असच हा आजचा योगायोग.. तरुणांच्या कानी घालावा असे वाटले..

Thursday, 9 February 2012

Real Heros - Ordinary People ExtraOrdinary Service ( जय जय.. जय जय.. हे ..)

गेले दोन दिवस, खूप बोचरी थंडी आहे... पण अंगावर शहारे आले ते ... IBN LOKMAT वरच्या Real Heros - Ordinary People ExtraOrdinary Service ची जाहिरात बघताना...
देशात..कॅमेरा आणि प्रकाशझोतात असलेल्या नसलेल्या काही ... मोजक्या लोकांव्यतिरिक्त काही असे लोक पण आहेत... की त्यांचे ... ध्येय व कार्य खूपच थक्क करून टाकणारे आहे..

मदुराई, कलकत्ता, पुरुलिया, मंगळूर, फैजाबाद, जालंधर अशा बऱ्याच ठिकाणी ... देशाच्या ...
कानाकोपऱ्यात असे बरेच लोक आहेत... की .... आपण कल्पना पण करू शकत नाही.. १४ वर्षाची मुलगी बालविवाह विरोधात लढतेय , नक्षलवादी भागात लहन मुलगी, मुलींची फुटबॉल टीम उभारतेय,५ स्टार हॉटेल चे शेफ हॉस्पिटल मध्ये... मोफत रुग्ण सेवा व त्यांना अन्न पुरवठा... करतोय .. एक व्यक्ती , वेश्या व्यवसायापासून मुक्ती व पुनर्वसनकरतेय एका वेश्येची मुलगी , अशिक्षित फळविक्रेता शाळेतल्या मुलांना मोफत फळ वाटप करून शिक्षणासाठी प्रेरित करतोय, ६० अनाथ मुलींना सांभाळतेय ... एक म्हातारी गरीब बाई... एक व्यक्ती बेवारस मेलेल्यांचे अंतीम कार्य करतोय, एक व्यक्ती लडाख मध्ये सैनिकासाठी सेवा पुरवतोय आणि बरेच काही... ही सगळी कामे करणाऱ्या व्यक्ती पाहाल तर .. अजूनच नवल वाटेल...

आणि बर का .. ही जाहिरात दाखवताना, पार्श्वभूमीवर सुरु असलेले..जन- गण- मन खरंच.. तेच खरा न्याय देतायत जणू .. राष्ट्रगीताला....

आणि थोड्या वेळाने.. बातम्यांवर महापालिकेच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची, प्रोफाईल दाखवली ...

खून, खुनाचा प्रयत्न, धमकावणे, सरकारी कामात अडथला आणणे, भ्रष्टाचारी, TADA आणि त्या सारख्या गुन्ह्या खाली शिक्षा भोगून झालेल्या, भोगत असलेल्या, आणि फरार असलेल्या लोकांना दिले आहे ... निवडणूक आयोगाने तिकीट.. !!
मुंबईत सगळ्या पक्षाचे मिळून २९५ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट मिळाले आहे ...
नाशिक व नागपूर मध्ये तर जवळ जवळ सर्वच ... गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत ..

काहींनी म्हटले आहे न... १०० में से ९९ बेइमान फिर भी मेरा देश महान...

Thursday, 19 January 2012

होय अंधारात चालतोय मी...

कोणी तरी म्हटले आहे... आपली आयुष्यात वाट ही लागलेलीच असते.. ती फक्त चालायची असते...
खरे तर हे आयुष्य म्हणजे एक सापशिडीचा खेळ झाला आहे.. कधी आयुष्यात साप येतात वाट्याला तर कधी शिडी सुद्धा येते नशिबी ..
कधी विचार केला तर वाटते, जणू  एका मिट्ट अंधार असलेल्या मार्गावरून चालतोय मी...
दोन्ही बाजूंनी खोल दरी... कलियुगातील खोटी.. प्रलोभने, वाईट व्यसने ... वाईट सवई, चुकीच्या गोष्टी, चुकीची संगत ... असा सगळ्या गोष्टींची.
अंधारात चालतोय मी,  अशा खोल दरी .. दोन्ही बाजूस..
आई वडील आणि काकांचे शिकवण आणि संस्काररुपी शिदोरी बरोबर घेऊन ..  जणू  शिदोरी नव्हे तर एक प्रकारची दोरीच.. ती पकडून चालतोय मी, अंधारमय दरी पार करतोय मी,
नसती ही दोरी तर, होतीच खोल दरी...
खरे तर हे आयुष्य म्हणजे एक सापशिडीचा खेळ झाला आहे.. कधी आयुष्यात साप येतात वाट्याला तर कधी शिडी सुद्धा येते नशिबी ..
कधी साप आला वाट्याला तर.. काही मागे जावे लागते काही पावले.. तरीही .. पावले चालत ठेवावी लागतात ... मिळेल जशी शिडी .. तशी संधी साधून वरच्या घरात प्रवेश.
पण अशा शिड्या मिळणे तसे कठीणच, त्या पेक्षा सापचं जास्त आडवे येतात.. अशा सापांना, दुध देऊन .. आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक वाटसरू सहप्रवाश्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर..
कधी विचार केला तर वाटते, जणू  एका मिट्ट अंधार असलेल्या मार्गावरून चालतोय मी...
अशा प्रवासात.. साथ मिळते ती काही खास मित्रांची .. सगळ्याच गोष्टी शेअर करणाऱ्या कोणाचीतरी .. नुसतीच साथ नसते बर का .. एक प्रकारच्या आधार देणाऱ्या कुबड्याच जणू ..
 मार्गात अडकल्यावर, ठेचकाळल्यावर, योग्य आधार देउन  पुन्हा उभे करणारे असे काही खास मित्र, खास क्षण.. खास असे विलक्ष्ण सोबती ..
आणि सगळ्यात शेवटी.. परमेश्वर तर आहेच पाठीशी, त्याची शक्ती जणू अंधाऱ्या काळोखात एक प्रकाश काजवा .. संपूर्ण अंधारात ... लुकलुकत .. मार्ग प्रकाशमय करणारा..

Dedicated to : आई-बाबा, काका, आशुतोष, आणि काही Very Very Special Friends ..

Friday, 13 January 2012

आज सकाळी ... मित्राकडे जातान ... सहज ... आकाशाकडे.. लक्ष गेले...

आज सकाळी ... मित्राकडे जातान ... सहज ... आकाशाकडे.. लक्ष गेले... आणि आकाश थोडे वेगळेच वाटले...
पूर्वी पासून संक्रांत म्हटली की, तो उत्साह काही औरच असायचा ... फिरकी काढा ... तिला ..डोंगरी ला जाऊन मांजा भरून घ्या.. पतंग .... ढेप च्या ढेप ... सगळे घ्यायचे..
आणि मग काय ... संक्रांतीच्या एक महिना अगोदरच.... आकाशात... पतंग दिसायचे ... गिरगावतल्या ... चाळीतल्या गच्चीवर आधी पासूनच सगळ्यांची ... पतंग उडवायला .. गर्दी ...
तसे आता... गिरगावात... टोलेजंग ... इमारती उभ्या राहिल्या.... सुरवातीला .. वाटले ..की ... चला .आता.. अजून उंच गच्ची मिळाली ... पतंग बदवायला .. मजा येईल.. पण ..हळू हळू सगळेच पालटत गेले आहे ..
आज चक्क १ दिवस राहिला संक्रांतीला... पण एक पतंग नाही आकाशात ? तो आरडा ओरडा .. पतंग पकडायला... उडणारी झुंबड .. सगळे विरून गेले आहे असे वाटते ..सध्याच्या.. WiFi पतंग उडवण्याच्या जमान्यात...

Thursday, 12 January 2012

डॉ. अब्दुल कलाम नी.. लिहिलेले पत्र "To our fellow Indians.."


I was in Hyderabad giving this lecture, when a 14 year old girl asked me for my autograph. I asked her what her goal in life is.
 
She replied: I want to live in a developed India.
 
For her, you and I will have to build this developed India. You must proclaim. India is not an under-developed nation; it is a highly developed nation.
 
Do you have 10 minutes? Allow me to come back with a vengeance.
 
Got 10 minutes for your country? If yes, then read; otherwise, choice is yours.
 
YOU say that our government is inefficient.
 
YOU say that our laws are too old.
 
YOU say that the municipality does not pick up the garbage.
 
YOU say that the phones don't work, the railways are a joke,
 
The airline is the worst in the world, mails never reach their
destination.
 
You say that our country has been fed to the dogs and is the absolute pits.
 
YOU say, say and say.
What do YOU do about it?
 
Take a person on his way to Singapore.
 
Give him a name?
YOURS.
 
Give him a face?
YOURS.
 
YOU walk out of the airport and you are at your International best.
 
In Singapore you don't throw cigarette butts on the roads or eat in the stores.
 
YOU are as proud of their Underground Links as they are.
 
You pay $5 (approx. Rs.60) to drive through Orchard Road (equivalent of Mahim Causeway or Pedder Road) between 5 PM and 8 PM.
 
YOU comeback to the parking lot to punch your parking ticket if you have over-stayed, identity.
 
In Singapore you don't say anything, DO YOU?
 
YOU wouldn't dare to eat in public during Ramadan, in Dubai.
 
YOU would not dare to go out without your head covered in Jeddah.
 
YOU would not dare to buy an employee of the telephone exchange in London at 10 pounds (Rs.650) a month to, "see to it that my STD and ISD calls are billed to someone else."
 
YOU would not dare to speed beyond 55 mph (88 km/h) in Washington and then tell the traffic cop, "Jaanta hai main kaun hoon (Do you know who I am?). I am so and so's son. Take your two bucks and get lost."
 
YOU wouldn't chuck an empty coconut shell anywhere other than the garbage pail on the beaches in Australia and New Zealand.
 
Why don't YOU spit Paan on the streets of Tokyo?
 
Why don't YOU use examination jockeys or buy fake certificates in
Boston ?????
 
We are still talking of the same YOU.
 
YOU who can respect and conform to a foreign system in other
countries but cannot in your own. You who will throw papers and cigarettes on the road the moment you touch Indian ground.
 
If you can be an involved and appreciative citizen in an alien
country, why cannot you be the same here in India?
 
Once in an interview, the famous Ex-municipal Commissioner of Bombay,  Mr.Tinaikar, had a point to make.
"Rich people"s dogs are walked on the streets to leave their affluent droppings all over the place," he said. "And then the same people turn around to criticize and blame the authorities for inefficiency and dirty pavements. What do they expect the officers to do? Go down with a broom every time their dog feels the pressure in his bowels?
 
In America every dog owner has to clean up after his pet has done the job.
Same in Japan. Will the Indian citizen do that here?"
He's right.
We go to the polls to choose a government and after that forfeit all responsibility.
We sit back wanting to be pampered and expect the government to do everything for us whilst our contribution is totally negative. We expect the government to clean up but we are not going to stop chucking garbage all over the place nor are we going to stop to pick a up a stray piece of paper and throw it in the bin.
We expect the railways to provide clean bathrooms but we are not going to learn the proper use of bathrooms.

We want Indian Airlines and Air India to provide the best of food and toiletries but we are not going to stop pilfering at the least opportunity.
 
This applies even to the staff who is known not to pass on the service to the public.
 
When it comes to burning social issues like those related to women, dowry, girl child and others, we make loud drawing room protestations and continue to do the reverse at home.
 
Our excuse?
"It's the whole system which has to change, how will it matter if I alone forego my son's rights to a dowry."
 
So who's going to change the system? What does a system consist of? Very conveniently for us it consists of our neighbours, other households, other cities, other communities and the government.
But definitely not me and YOU.
 
When it comes to us actually making a positive contribution to the system we lock ourselves along with our families into a safe cocoon and look into the distance at countries far away and wait for a Mr. Clean to come along & work miracles for us with a majestic sweep of his hand or we leave the country and run away.
 
Like lazy cowards hounded by our fears we run to America to bask in their glory and praise  their system.
 
When New York becomes insecure we run to England.

When England experiences unemployment, we take the next flight out to the Gulf.
 
When the Gulf is war struck, we demand to be rescued and brought home by the Indian government.
 
Everybody is out to abuse and rape the country.
 
Nobody thinks of feeding the system.
 
Our conscience is mortgaged to money.
 
Dear Indians, the article is highly thought inductive, calls for a great deal of introspection and pricks one's conscience too?..
I am echoing J.F. Kennedy's words to his fellow American to relate to Indians?.
"ASK WHAT WE CAN DO FOR INDIA AND DO WHAT HAS TO BE DONE TO MAKE INDIA  WHAT AMERICA AND OTHER WESTERN COUNTRIES ARE TODAY "
 
Lets do what India needs from us.

Thank You,
Dr. Abdul Kalaam

ऑफीसला जाताना ... ट्रेन मध्ये .. (India & Baggars in Mumbai)

१६ डिसेंबर निमित्त ... विजय दिवसाचा... अभिमानास्पद.. स्टेट्स ...शेअर केल्यावर .. खूप छान वाटतात...होते... पण तो आनंद ..फार काळ टिकला नाही..

दुपारी.. ऑफीसला जाताना ... ट्रेन मध्ये .. काही .. परदेशी ..नागरिक... माझ्या ..डब्यात ...सेकंड क्लास .. मध्ये ..होते.... मी डब्यात ..आजूबाजूला ..नजर टाकली.. जर्मन मेड डबा होता... आणि योग योगाने .. स्वच्छ ...होता .. काही .. फालतू ... जाहिरातींचे फाटलेले अवशे...
ष नवते... जरा बरे वाटले ...

ते परदेशी ... नागरिक.. नवखा देश .. नवखा लोकल प्रवास ...आणि प्रवासी .... सगळे न्याहाळत होते... त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित . समाधानकारक होते... पण... इतक्यात... महालक्ष्मी स्टेशन ला... ला एक भिकारी... आला... सगळा डबा फिरून ... त्या ...फोरेनार्स कडे गेला .... हे सर्व पाहून.... माझ्या मनात .. इतके ..वेगवगळे ..विचार... इतक्या पटापट ... वादळासारखे ... थैमान घालून गेले....

मलाच लाज वाटली .... आणि लोअर परेल .. ला मी ...उठून दरवाजात.... जाऊन ... उभा राहिलो...

सगळ्यात महत्वाचे ... म्हणजे ... त्या भिकाऱ्याला पाहून .. परदेशी पाहुण्यांनी ... अगोदरच .. पैसे.. काढून... ठेवले ..त्याला ..देण्यासाठी.....

मी काही तरी करायला पाहिजे होते ...का .. असा प्रश्न ..अजून माझ्या मनात ...आहे ...

Wednesday, 11 January 2012

वैचारिक भावनांचा केमिकल लोचा डिजिटल स्वरुपात...

बरेच काही लिहावेसे वाटते ... बरेच काही सुचते पण...  "पण ?"
काय करणार...समोर लिहून काढायला काही हवे न ... खूप काही ... मनात येते .. बरेच काही वाटत असत ... लिहाव सांगाव ..
ब्लॉग हे एक छान माध्यम आहे.. व्यक्त होण्यासाठी .. नाही का ...
कधी ... नोट -पॅड, कधी वर्ड -पॅड, काही पण चालेल ... पण समोर काहीतरी हवे. माझ्या हातात... नोट -पॅड येणे तसे कमीच ... एक दैनंदिनी काय ती रोज अपडेट करतो ...
तेवढेच कागदावर काहीतरी खरडल्याचे समाधान .. सध्याच्या .. TABLET PC च्या जमान्यात, online editing चा एकाच पर्याय.
मनातली वादळे, शमवण्याचे एक साधन ... तसे फेसबुक, ट्वीटर... आणि काय काय .. साईट आहेतच ... पण तिकडे पोस्ट अपलोड केले तर, म्हणे "Good Use Of - Ctrl C & Ctrl V "
मग काय ... मनात आले ... आधी एका मित्राचा आणि मैत्रिणीचा ब्लॉग पहिला होता ... मग .. म्हटले आपण पण कुंचला (KeyBoard ) उचलावा ..
एका मैत्रिणी ने मदत केली ... ब्लॉग स्पेस आणि प्रोफाईल बनवायला ... आणि ... मग चालू झाला ...  ब्लॉगिंग .. प्रपंच ... वैचारिक भावनांचा केमिकल लोचा (मुन्नाभाई सिनेमा मधला केमिकल लोचा नाही बर का...) डिजिटल मार्गाने... डिजिटल स्वरुपात... खरडायला सुरवात ...

माझ्या FB अकाउंट मध्ये असलेल्या सर्वांसाठी..

माझ्या FB अकाउंट मध्ये असलेल्या सर्वांसाठी..

सगळे माझे पोस्ट वाचून मला विचारात असतात की.. प्रेमात वगैरे पडलास का ?
पण मी विचारतो ...की प्रेमात पडल्यावरच  असे पोस्ट (काव्यमय) अपलोड  करायचे असे कुठे लिहिले आहे का ?
सगळ्यांनी माझी अवस्था .. "मै शायर बदनाम" अशी करून टाकली आहे ?
मला सांगा ... १६९८ पासून किंवा कदाचित त्याही आधी पासून पु. ल., कुसुमाग्रज, नामदेव ढासळ, सुनिता देशपांडे यासारखे.. दिग्गज ..काय प्रेमात पडले होते म्हणून कविता केल्या काय ?
इतकी सुंदर रचनाकार आपल्याकडे इतिहासापासून असताना .. आपण काव्य आणि चांगले वाड्मय वाचले .. लिहिले, स्पुरले.. उपलोड आणि शेअर केले तर काय झाले ?
माझ्या इतर पोस्ट कडे न वाचता पाहता ... जर का तेच पोस्ट वाचले तुम्ही तर, त्याला मी काय करू शकतो?
प्रेमात पडायला जाताना आणि प्रेमात धडपडायला पण जाताना..... 
आणि समजा प्रेमात पडलोच.. तरी पण मला एक सांगा ? "मै करू तो साला कॅरक्टर ढिला है ?"
आता याचा अर्थ काही जण नक्कीच विचारतील की ... मुख्य प्रश्न उरतोच ...
तेव्हा मला सांगावेसे वाटते की, उ.. ला.. ला... फेम- विद्या बालन ने सांगितले आहेच की,  "जब शराफत का नक़ाब हटता  है तो सबसे ज्यादा मजा शरीफो को ही आता है.!"
List  Of Marathi Poem  & Writers :(FYI )
http://en.wikipedia.org/wiki/Marathi_poetry 
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Marathi_writers  

आयुष्यात एकदा तरी ...

आयुष्यात एकदा तरी ... मला  IAF च्या एअर बेस वर जायचे आहे ..
सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी .. सूर्याच्या पहिल्या किरणासोबत मला... IAF
च्या सूर्यकिरण या विमानाच्या कॉकपीट मधून सूर्याला सलामी दयायची आहे ...

आयुष्यात एकदा तरी ... मला फायटर प्लेन मध्ये बसायचे आहे...
आणि विमानाचे कॉकपीट ची कॅनोपी बंद करून ...
थ्रोटल अप करताना.. वाटणारे थ्रील अनुभवायचे आहे ....

तो Jet Thrust, आणि engine
चा गुरगुरणारा आवाज. ऐकायचा आहे ...

आयुष्यात एकदा तरी ... मला INS VIRRAT
च्या डेक वर जायचे आहे...
खवळणाऱ्या समुद्रात.. INS VIRRAT च्या डेक वरून SEA HARRIER
उडवायचे आहे...
आणि एक फेरी मारून पुन्हा परत येऊन VERTICAL LANDING
करायचे आहे...

आयुष्यात एकदा तरी ... मला SEA HARRIER उडवायचे आहे... AirCraftCarrier वरून मला SEA HARRIER .. VERTIKAL TAKEOFF
ने उडवायचे आहे...
आणि VERTICAL LANDING
करायचे आहे...

आयुष्यात एकदा तरी ... मला जेट फायटर मधून वाऱ्याशी स्पर्धा करायची आहे...

आयुष्यात एकदा तरी ... मला IAF
च्या एअर बेस वर जायचे आहे ...
एकदातरी... सुखोई ३० एम के आय ... उडवायचे आहे...
एकदातरी MULTIरोल FIGHTER
म्हणजे काय ते अनुभवायचे आहे..

आयुष्यात एकदा तरी ... मला F16 उडवायचे आहे...F16 चे ९G मला एकदा तरी फील .. करायचे आहे...MACH
२ च्या फुल स्पीड ने .. गगन भेदायचे आहे ...

आयुष्यात एकदा तरी ... मला १४ TOMCAT
उडवायचे आहे...
आणि वाऱ्यावर स्वार असताना ... WING SWEEP
करून.. जबरदस्त सूर मारायचा आहे ...
एकदातरी तो SUPERSONIC
थरार अनुभवायचा आहे...

आयुष्यात एकदा तरी ... मला MIG 29
उडवायचे आहे...
आणि TOP GUN SCHOOL च्या फायटर पायलटना डिचवायचे आहे... IAF चे च फायटर पायलटस फक्त आकाशाचे राजे आहेत असे ठणकावायचे आहे...