Thursday, 19 January 2012

होय अंधारात चालतोय मी...

कोणी तरी म्हटले आहे... आपली आयुष्यात वाट ही लागलेलीच असते.. ती फक्त चालायची असते...
खरे तर हे आयुष्य म्हणजे एक सापशिडीचा खेळ झाला आहे.. कधी आयुष्यात साप येतात वाट्याला तर कधी शिडी सुद्धा येते नशिबी ..
कधी विचार केला तर वाटते, जणू  एका मिट्ट अंधार असलेल्या मार्गावरून चालतोय मी...
दोन्ही बाजूंनी खोल दरी... कलियुगातील खोटी.. प्रलोभने, वाईट व्यसने ... वाईट सवई, चुकीच्या गोष्टी, चुकीची संगत ... असा सगळ्या गोष्टींची.
अंधारात चालतोय मी,  अशा खोल दरी .. दोन्ही बाजूस..
आई वडील आणि काकांचे शिकवण आणि संस्काररुपी शिदोरी बरोबर घेऊन ..  जणू  शिदोरी नव्हे तर एक प्रकारची दोरीच.. ती पकडून चालतोय मी, अंधारमय दरी पार करतोय मी,
नसती ही दोरी तर, होतीच खोल दरी...
खरे तर हे आयुष्य म्हणजे एक सापशिडीचा खेळ झाला आहे.. कधी आयुष्यात साप येतात वाट्याला तर कधी शिडी सुद्धा येते नशिबी ..
कधी साप आला वाट्याला तर.. काही मागे जावे लागते काही पावले.. तरीही .. पावले चालत ठेवावी लागतात ... मिळेल जशी शिडी .. तशी संधी साधून वरच्या घरात प्रवेश.
पण अशा शिड्या मिळणे तसे कठीणच, त्या पेक्षा सापचं जास्त आडवे येतात.. अशा सापांना, दुध देऊन .. आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक वाटसरू सहप्रवाश्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर..
कधी विचार केला तर वाटते, जणू  एका मिट्ट अंधार असलेल्या मार्गावरून चालतोय मी...
अशा प्रवासात.. साथ मिळते ती काही खास मित्रांची .. सगळ्याच गोष्टी शेअर करणाऱ्या कोणाचीतरी .. नुसतीच साथ नसते बर का .. एक प्रकारच्या आधार देणाऱ्या कुबड्याच जणू ..
 मार्गात अडकल्यावर, ठेचकाळल्यावर, योग्य आधार देउन  पुन्हा उभे करणारे असे काही खास मित्र, खास क्षण.. खास असे विलक्ष्ण सोबती ..
आणि सगळ्यात शेवटी.. परमेश्वर तर आहेच पाठीशी, त्याची शक्ती जणू अंधाऱ्या काळोखात एक प्रकाश काजवा .. संपूर्ण अंधारात ... लुकलुकत .. मार्ग प्रकाशमय करणारा..

Dedicated to : आई-बाबा, काका, आशुतोष, आणि काही Very Very Special Friends ..

No comments:

Post a Comment