Thursday, 16 February 2012

असाच हा आजचा योगायोग.. आणि मुंबई महापालिकेचे मतदान.

आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा दिवस होता, सरकारी कर्मचारी आणि बँकांमध्ये हक्काची सुट्टी, आता हक्काची सुट्टी म्हटली म्हणजे... मतदानाचा हक्क बर का. तो खरच किती जन बजावतात तोही चर्चेचा विषय आहे .. आता काय... चर्चा - चर्चा - चर्चा बसं एवढच उरले का असा प्रश्न पडतो... सगळ्या News Chennel वाल्यांना एकाच काम .. तोंडाची वाफ नेते कसे वाया घालवतात ..आणि .. प्रचारात विकत आणलेल्या बाहुल्या कशा टाळ्या वाजवतात... हेच दाखवायचे का असते कोणास ठाऊक.

कॉर्पोरेट मध्ये आणि IT मध्ये सुट्ट्या मिळणे म्हणजे जणू आठवडाभर कोणीतरी नाक दाबून ठेवले आहे आणि एक दिवस श्वास घ्यायला उसंत.. नियमाप्रमाणे कर्मचार्यांना आणि कॉर्पोरेट मध्ये बॉस च्या चाबुकाच्या धाका खाली काम करणाऱ्या EXCUTIVE गाढवांना मतदानास कामाच्या वेळेमधून मतदान करण्यासाठी सकाळी २ तास उशिराने किंवा २ तास लवकर जाण्याची मुभा दिलेली असते.

आता काही जण म्हणत असतील की तरुण पिढीला मतदान करण्यात इंटरेस्ट नसतो .. पण जर सोशल नेटवर्किंग वरच तरुण पिढी प्रतिसाद देत असेल तर ती.. मतदान करण्यासाठी सुद्धा मतदान केंद्रावर तेवढ्याच उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे रांग लावण्यास जमते..

आज सकाळी मतदान करायला केंद्रावर गेलो तेव्हा माझीच शाळा मला मतदान केंद्र म्हणून आली. तेव्हा सहज विचार येऊन गेला मनात की .. मतदान केंद्रे ही नेहमी शाळेतच का ठेवतात.. उगाच मुलांच्या शाळा दोन दिवस बुडतात. पण " शिशु वर्गात " एक काढलेले चित्र पाहून वाटले .. सुज्ञ पणे विचार केला तर लक्षात येईल, शाळा हे विद्येचे मंदिर आहे.. आपले संस्कार, आचार विचार, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपले मत मांडण्याची नैतिक पद्धत आपल्याला शाळेतच शिकवली जाते.. या सर्व गोष्टी आपण स्मरून मग सुज्ञ पणे विचारपूर्वक मत दिले पाहिजे असा त्या मागचा हेतू असावा का कदाचित ?

तसा आज घरीच होतो.. मतदान करून आल्यावर Laptop चालू केला पण पुढ्यात पडलेली " प्राण जाये पर शान न जाये" सिनेमाची सीडी दिसली .. आणि खूप दिवसांनी तो सिनेमा पहिला, त्यातली ती चाळ, तिथली वस्ती, भांडणे, प्रेम आणि बऱ्याच गमतीजमती सगळे काही ओळखीचे वाटले ... अरेरे हो ... मी पण गिरगावात एका चाळीतच राहतो की.. सार काही अगदी तसच.. अगदी "बिल्डर" नावाच्या सापांनी सुद्धा त्या सिनेमासारखा गिरगावाला विळखा घातला आहे .. हे लक्षात आले..

असच हा आजचा योगायोग.. तरुणांच्या कानी घालावा असे वाटले..

Thursday, 9 February 2012

Real Heros - Ordinary People ExtraOrdinary Service ( जय जय.. जय जय.. हे ..)

गेले दोन दिवस, खूप बोचरी थंडी आहे... पण अंगावर शहारे आले ते ... IBN LOKMAT वरच्या Real Heros - Ordinary People ExtraOrdinary Service ची जाहिरात बघताना...
देशात..कॅमेरा आणि प्रकाशझोतात असलेल्या नसलेल्या काही ... मोजक्या लोकांव्यतिरिक्त काही असे लोक पण आहेत... की त्यांचे ... ध्येय व कार्य खूपच थक्क करून टाकणारे आहे..

मदुराई, कलकत्ता, पुरुलिया, मंगळूर, फैजाबाद, जालंधर अशा बऱ्याच ठिकाणी ... देशाच्या ...
कानाकोपऱ्यात असे बरेच लोक आहेत... की .... आपण कल्पना पण करू शकत नाही.. १४ वर्षाची मुलगी बालविवाह विरोधात लढतेय , नक्षलवादी भागात लहन मुलगी, मुलींची फुटबॉल टीम उभारतेय,५ स्टार हॉटेल चे शेफ हॉस्पिटल मध्ये... मोफत रुग्ण सेवा व त्यांना अन्न पुरवठा... करतोय .. एक व्यक्ती , वेश्या व्यवसायापासून मुक्ती व पुनर्वसनकरतेय एका वेश्येची मुलगी , अशिक्षित फळविक्रेता शाळेतल्या मुलांना मोफत फळ वाटप करून शिक्षणासाठी प्रेरित करतोय, ६० अनाथ मुलींना सांभाळतेय ... एक म्हातारी गरीब बाई... एक व्यक्ती बेवारस मेलेल्यांचे अंतीम कार्य करतोय, एक व्यक्ती लडाख मध्ये सैनिकासाठी सेवा पुरवतोय आणि बरेच काही... ही सगळी कामे करणाऱ्या व्यक्ती पाहाल तर .. अजूनच नवल वाटेल...

आणि बर का .. ही जाहिरात दाखवताना, पार्श्वभूमीवर सुरु असलेले..जन- गण- मन खरंच.. तेच खरा न्याय देतायत जणू .. राष्ट्रगीताला....

आणि थोड्या वेळाने.. बातम्यांवर महापालिकेच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची, प्रोफाईल दाखवली ...

खून, खुनाचा प्रयत्न, धमकावणे, सरकारी कामात अडथला आणणे, भ्रष्टाचारी, TADA आणि त्या सारख्या गुन्ह्या खाली शिक्षा भोगून झालेल्या, भोगत असलेल्या, आणि फरार असलेल्या लोकांना दिले आहे ... निवडणूक आयोगाने तिकीट.. !!
मुंबईत सगळ्या पक्षाचे मिळून २९५ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट मिळाले आहे ...
नाशिक व नागपूर मध्ये तर जवळ जवळ सर्वच ... गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत ..

काहींनी म्हटले आहे न... १०० में से ९९ बेइमान फिर भी मेरा देश महान...