Thursday, 6 December 2018

घंटा !!

८ डिसेंबर २०१८ रोजी असणाऱ्या शाळेच्या २००२ बॅचच्या गेटटुगेदर निमित्ताने सुचलेले..

दुसरी घंटा झाली की घरातून निघायचे. होय... घर शाळेच्या अगदीच जवळ असल्याने शाळेची घंटा घरी ऐकू येत असे.. त्यामुळे दहा वर्ष हाच शिरस्ता..


इथून दिवसाची सुरुवात व्हायची..


चुकून लेट झालाच तर मग आता प्रिफेक्ट्स पकडतील असा विचार मगन चे दुकान येईपर्यंत मनात आलेला असायचा..


पहिला तास मूल्य शिक्षणाचा..

घंटा वाजली की सगळे सावधपणे (क्लास टीचर आता येतील या कडे लक्ष) मस्तीत मश्गूल..

असेच तासा मागून तास जायचे, मग पाचवा तास आला की मधल्या सुट्टीचे वेध..


बस.. घंटा वाजली की एकच कल्ला..!!

पटापट डबा खाऊन खाली अंगणात प्लास्टिक फुटबॉल खेळायला जायचे..
अंगणातली या टोकापासून त्या टोकापर्यंत इतकी मोठी गोल पोस्ट!!

पुन्हा घंटा व्हायची.. पहिली घंटा,  दुसरी घंटा.. आणि तिसरी.. त्या नंतर कुठे टाईम आऊट व्हायचा..


पुन्हा तास सुरू.. पुन्हा अभ्यास सुरू..

यातच पी. टी. चा आणि चित्रकलेचा तास म्हणजे धम्माल !!
गच्ची फुटबॉल चा शोध पण इथेच लागला...!!
पुन्हा घंटा व्हायची पुन्हा मन रेंगाळत वर्गात जायचं...

संध्याकाळी शाळा सुटायची शेवटची घंटा.. पुन्हा एकदा एकच कल्ला..!!

कधी कधी शिक्षक तेव्हा पवित्रा घ्यायचे.. एवढा धडा संपवून घेऊ, अजून १० मिनिट थांबा.

घरी जाताना हरी कडे चिंचा गोळ्या घेऊन जायचे...


मागे असलेल्या माती कामाच्या पिंजऱ्यात सुरू झालेली जडण घडण कुंभाराच्या मडक्या प्रमाणे होत गेली... प्रयोगशाळा, वागळे हॉल, लायब्ररी या सर्वच गोष्टी म्हणजे कुंभाराचे चाकच जणू...


शाळा सुटली.. कॉलेज सुरू झाले.. मग नोकरी आणि व्यवसाय...

मग जाणवते की शाळाचं बरी होती...आणि आठवते ती शाळेच्या घंटे ने शिकवलेली वेळेची शिस्त..

आता अलार्म क्लॉक आणि आऊटलुक कॅलेंडर वर धावणारे.. धावणारे कसले जीव ओढत पळणारे लाईफ.. या सर्वात आपल्या शाळेच्या घंटे ची आठवण आल्याशिवाय राहत नाही..


आणि हो.. शाळा म्हटली की शिक्षकांची आठवण आलीच.. पण शाळेची घंटा म्हटली की नवरे काका, गायकवाड काका, जावळे काका,  बेटकर काका आणि समस्त शिपाई काकांना कसे बरे विसरून चालेल ??


🙏 शीलं परं भूषणम् 🙏

Saturday, 17 March 2018

।। पडघम गिरगाव गुढीपाडव्याचे ।।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

घालू फेटा अभिमानाचा अन वैभवाचा ।
परिधान करू कुर्ता परंपरेचा अन एकोप्याचा ।

नेसू साडी नऊवारी कर्तृत्वाची अन पराक्रमाची ।
लेऊन शृंगार ममतेचा अन समतेचा ।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

सजवू भगवे ध्वज हिंदुत्वाचे अन शौर्याचे ।
सजवू अब्दागिर नेतृत्वाचे अन स्फुल्लिंगचे ।

सुशोभित गिरगाव आपुले रांगोळीने अन संगीताने।
लावून तोरणे झेंडूची ही स्वागताची अन समृद्धी ची।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।


चढवू पाने ढोलची सर्वसमर्पित शक्तीने अन ताकतीने ।
असतील ताशे सोबतीला अन टोल ही दुमदुमून जातील नाद हे आसमंतीचे ।

निसर्ग होई प्रसन्न सारा वासुदेवाच्या टाळाने अन चिपळीने ।
स्फुरण चढते तुतारी अन शंख ध्वनीने ।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

चला करू बुलेट वारी नेसून नऊवारी अन वाढते धडधड हृदयाची अन आसमंताची ।

छोटे शिवबा अन छोट्या झाशीच्या राणी असतील कौतुक सोहळे ।
पडेल पाऊल पुढचे सुदृढ भविष्याचे अन नेतृत्वाचे।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

चित्ररथ अन युद्धकौशल्याच्या सोबतीला असतील मल्लखांबाची प्रात्यक्षिके ।
वैभवशाली परंपरेची प्रदर्शन घडते  वैभवसंपन्न गणेशमूर्तीच्या साक्षीने ।

फडके गणपती पासून सुरू होतो सोहळा आनंदाचा अन नववर्षाचा ।
पोलीस अन व्यवस्थेच्या समन्वयाने आनंद द्विगुणित होतो आप्तजनांचा ।

Tuesday, 17 May 2016

बदलापूर समर एंडिंग्ज...

सकाळस कोकीळ आणि चिमण्यांची किलबिल..
डोंगरावरून परावर्तित होणारी सूर्यनारायणाची सोनेरी उधळण...

ऑफिस ला निघता... स्टेशन च्या वाटेत... सदाफुली भेटते, ती सांगते रोज कितीही जण आले खुडायला तरी रोज आनंदी रहायचं रोज सकाळी पुन्हा नव्यानं फुलायचं आणि गुलमोहर जणू गुड डे.. बोलायला वाटचं पाहत असतो..

आता लवकरचं पाऊसाची चाहूल..
त्यामुळे चिमण्यांची घरटं बांधायची लगबग...

1नंबर वातावरण...




 

Wednesday, 14 August 2013

Let Freedom Never Perish In Our Hands (अब "हमारे" हवाले वतन साथीयो... )

आज मुद्दामून  वेळ काढून लिहितोय … अलीकडची देशातली परिस्थिती पाहता मुद्दामून बोलावस वाटलं  या विषयावर…
देशभक्ती या विषयावर  बऱ्याच भावनिक चर्चा  झडतात...

 काही दिवसांपूर्वी काही  जण बोलत होते की, " यार आपण भारत देशात का  जन्माला आलो..!  " महागाई, भ्रष्टाचार, रोजगाराचे प्रश्न आणि मुख्य आणि सध्याचा गाजणारा मुद्धा म्हणजेच पाकिस्तानी कुरापती आणि सरकारची मुग गिळणारी  ग्लोबल डिप्लोमेसी.
एक पोस्ट असा होता की, " आपल्याला यंदाचा स्वातंत्र्य दीन आपण न साजरा करता, त्याचा निषेध केला पाहिजे."  फार निराशावादी पोस्ट होता तो आणि त्या ही पेक्षा बेजवाबदार आणि अविचारी.
 "भारत माझा देश आहे"  ही प्रतिज्ञा आपल्याला काय शिकवते ? जे काही घडतय त्याचा आपणही भाग आहोत  हे आपण कधी समजणार ?

देशात बरेच प्रश्न आ वासून उभे आहेत हे मान्य, पण   …

तो सन्मान हा राष्ट्राचा आणि  राष्ट्रध्वजाचा असतो...  तो सन्मान हा देशातल्या शेतकऱ्यांचा असतो … तो सन्मान हा देशाच्या शास्त्रज्ञांचा असतो … तो सन्मान हा देशातल्या करदात्या श्रमिकांचा असतो …  तो सन्मान हा देशाच्या शूरवीर बहाद्दुरांचा असतो… तो सन्मान हा देशातल्या वीरमाता आणि भगिनींचा असतो… तो सन्मान देशाच्या संस्कृतीचा असतो … तो सन्मान हा विविधातेतल्या एकतेचा असतो…  आपण आपण देशाच्या प्रगतीचा भाग आहोत याचा तो स्वाभिमान असतो...  तो सन्मान राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या पंतप्रधान पदाचा असतो…
राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या पंतप्रधान पदावर विराजमान व्यक्ती कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हा वेगळा भाग.

स्वातंत्र्य दीन साजरा करणे म्हणजे झेंडा वंदन करणे इतकेच नव्हे … तर आपल्याला एक दूरगामी परिणाम करणारी  Positive Energy आणि देशाला .प्रगतीपथावर नेण्याची प्रेरणा मिळते.


आणि अजून एक गोष्ट अशी की, काहीजण भावनेच्या भरात पाकिस्तान  बद्दल चुकीचे बोलताना आढळतात, पाकिस्तानचा राष्ट्रध्वज हा  सुद्धा त्यांचा स्वाभिमान आहे.   आपला स्वतःचा स्वाभिमान बाळगणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु
स्वतःचा स्वाभिमान बाळगताना, दुसऱ्याचा अपमान करणे आपल्याला शोभत नाही आणि आपली संस्कृती सुद्धा ते शिकवत नाही.

असो मी फार काही बोलत नाही आपण सर्व सुज्ञ आहोत …

चल तर मग, स्वातंत्र्य दिना निमित्त एकत्र येऊ आणि आपल्यात एक नवचेतना निर्माण करू.


जय भारत … !!!

Saturday, 15 June 2013

Best Of Luck Cadet Shubham Tiwari ..!!

बरेच दिवस काही लिहिले नव्हते, सुचत असूनही वेळेने बांधून ठेवले होते.  आज खूप दिवसांनी रोमांच पुल्लंकित भावना व्यक्त कराविशी वाटली.

घरच्यांच्या तोंडाला फेस आणणारे फेसबुक आणि फेसबुक मधली मित्रमंडळी, या पलीकडे जाऊन आपलीशी बनतात तर कधी कारण नसताना जवळची वाटतात.  

खर तर कारणहीतसेच आहेच कदाचित; IAF (Indian Air Force) च्या एका  Page वर ओळख झालेला मित्र शुभम. राहणारा दिल्लीचा. त्यामुळे फार कधी बोलणे झाले नाही पण, त्याची आवड आणि IAF ची करिअर म्हणून निवड यामुळे मैत्री  वाढली.  आज त्याच फेसबुकच स्टेटस पाहून खूप आनंद झाला.  आज तो  IAF मध्ये -Cadet Shubham Tiwari म्हणून जॉइन झालाय.  एखाद्याने स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण होताना पाहून खूप आनंद होतो.

शुभम च्या निमित्ताने असेच काहीस वाटतय. जणू स्वत:च स्वप्न पूर्ण होतय. कदाचित खोट वाटेल पण,  वर म्हटल्या प्रमाणे त्याला Best Of  Luck ची  Commnet करताना रोमांच पुल्लाकीत झाले !!  अचानक शहरे आलेले जाणवले. !!

नभ: स्पर्श दीप्तम: म्हणजेच Touch The Sky With Glory !! याचा खरा अर्थ अनुभवणे कसे असेल या कल्पनेतच मन Mach-२ च्या वेगाने कोटीच्या कोटी  उड्डाण भरू लागते.   


कॅडेट शुभम तिवारीला हार्दिक शुभेच्छा !!


 

Saturday, 26 January 2013

" फक्त भारतवासी "


ए मेरे वतन के लोगो  .. तुम खूब लगा लो नारा ..
ये शुभ दिन है सबका .. लेहेरालों तिरंगा प्यारा .. 

पर मत भूलो सीमा पर .. विरोने है प्राण गवाए ..
कुछ याद उन्हें भी कर लो .. जो लौट के घर ना आए ..

कोई सिख कोई जाट मराठा .. कोई गोरखा कोई मद्रासी ..
सरहद पर मरनेवाला हर वीर था भारतवासी ..

मित्रांनो .. या गीतामध्ये Indian किंवा हिंदुस्तानी तत्सम शब्दप्रयोग न करता " फक्त भारतवासी " असे शब्द वापरले आहेत बर का .. जात-धर्म-पंथ ह्या धारणा फक्त आपल्याच असतात.. सीमेवरील सैनिक असा विचार करायला लागेल मग झाले...  सैनिक तर सगळे एकमेकांसाठी जगत असतात; त्यांच्यासाठी फक्त "भारतवासी " हा एकच धर्म - एकच जात ... 

आपली आणि आपल्या नातेवाईकांची इच्छा असते की, आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणेच अंत विधी झाले पाहिजेत आणि सैनिकांची एकच  इच्छा तिरंग्यात लपेटून सलामी - ए शस्त्र अशा इतमामात अंतिम संस्कार ... !!

आपण काही गोष्टींची कल्पना पण करू शकत नाही, कोणत्या गोळीवर आपले नाव लिहिले असेल ?? आपण फक्त पुतळे आणि स्मारक बांधण्यात आणि त्यासाठी जागा शोधण्यात स्वतःची आणि पर्यायाने देशाची वेळ, शक्ती, यंत्रणा सगळेच फुकट घालवतो. सैनिकांची कुटुंबे ??? त्यांना एक वीरता पदक असलेला कागद दिला जातो ..!!

आज आपण ६४ वा प्रजासत्ताक दिन साजरी करतोय; आज ६४ वर्षानंतर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते सर्व यश -अपयश सर्व गोष्टींस आपण पूर्णपणे जवाबदार आहोत..  आज आपली दूरदृष्टी  कुठपर्यंत आहे ?? भविष्यात कुठपर्यंत आपण पाहू शकतोय?

सगळे मला विचारतात, काय रे तू काय आर्मी मध्ये आहेस का, इतके सगळे आर्मी बद्दल FB वर Share करतो? पण खरे सांगू तर.... त्यांची शिस्त, जीवनपद्धती, एकीची भावना, कोणत्याही परिस्थिती मध्ये ... तक्रार न करता... आपले कर्तव्य करत रहाणे अजिबातच सोपे नाहीये, शौर्य-त्याग-अद्द्वितीय DRDO या सगळ्या गोष्टींचा एक जबरदस्त मिलाफ आपल्याला संरक्षण दलात पाहायला मिळतो आणि तो सुद्धा National & Global Diplomacy सांभाळून.

सीमेवर मायनस डिग्री मध्ये २४ तास खडा पहारा देणारी आर्मी , आणि महिनोंमहिने समुद्राच्या लाटांशी आणि समुद्र तळाशी पहारा देणारी नेव्ही, आणि आपण रात्री झोपलो असताना आणि डिस्को -पब मध्ये बेधुंध असताना, हजारो फुटावरून घिरट्या घालणाऱ्या एअर फोर्स चे पायलट दक्ष पणे आपल्या शहराचे आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांचा हा दिवस, तसेच शूर आणि कर्तव्यदक्ष नागरिकांचा सन्मान आणि संस्कृती आणि तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा गौरव करण्याचा हा दिवस.

तसं पाहायला गेलं तर, काल National Voters Day होता, पण कदाचितलोकांना हे माहित असेल, तसेच भारत -चीन युद्धाच्या दोन महिन्यानंतर  २६ जानेवारी १९६३या दिवशी लता दिदींनी रामलीला मैदानात हे गाणे पहिल्यांदा गायले होते आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सकट समस्त प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

पण आज नक्कीच बोलावेसे वाटते,  जय जवान- जय किसान - जय विज्ञान - जय भारत !!!

शं नौ वरुण: (घोष वाक्य: भारतीय नौदल)
शस्त्रातून शक्ति   (घोष वाक्य: भारतीय पायदळ)
नभं स्पर्श दीप्तम  (घोष वाक्य: भारतीय हवाईदल)


Friday, 11 January 2013

आयुष्यात पुन्हा एकदा मन बोलू पहाते "नभ: स्पर्श दीप्तम" (आयुष्यात एकदा तरी ... भाग २)


आयुष्यात पुन्हा एकदा मन बोलू पहाते "नभ: स्पर्श दीप्तम(आयुष्यात एकदा तरी ... भाग २)

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. Air Force मध्ये मन वाहून नेते..
हवाई दलाच्या अन अद्वितीय Avionics च्या पुन्हा एकदा प्रेमात पाडते..

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. KC-130 मध्ये बसून... तहानलेल्या जेट्स ची तहान  भागवू पहाते..
F-16
ची 450 Gallons ची  Fuel Tank फक्त 30 सेकंदात Air -To -Air  Refueling चा थरार अनुभवू पहाते ..
अन 24 तास उडत राहण्याची क्षमता विमानाला बहाल करू पहाते .. 

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. C-17 मध्ये बसू पहाते ..
170,900 lbs च्या Payload सकट आकाशात भरारी घेऊ पहाते..
आणि आपल्या Landing Gear वर विश्वास टाकून तितक्याच वजनासकट जमिनीवर उतरू पहाते .. 

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. AWACS मधल्या RADAR Panel वर स्थिरावू पहाते ...
शत्रूच्या प्रदेशात शेकडो मैलांवरून घारीपेक्षा तीक्ष्ण नजरेने लक्ष ठेवणारी कार्य प्रणाली अनुभवू पहाते ..
आपल्या Defense System ला शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती पुरवू पहाते ..

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. B-2किंवा F-117 मध्ये बसू पहाते .. अगदीच नाही तर B-52 मधून भरारी घेऊ पहाते..
F-117
मधून Stealth Operations करताना शत्रूच्या RADAR ला तुरी देऊ पहाते ..
B-2
आणि B-52 मधून Stealth Carpet Bombing करून शत्रूची दाणादाण उडवू पहाते ..

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. Lockheed C-5 Galaxy आणि Airbus Beluga च्या Cockpit मध्ये जाऊन बसते..
 A-380 चा संपूर्ण Fuselage आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या  ह्या  उडणाऱ्या हत्तीचे Pilot  रूपी माहूत बनू  लागते..
47 Ton लोड करून  वाऱ्याशी स्पर्धा करण्यासाठी Beluga च्या Cockpit मध्ये ATC चा Takeoff च्या इशाऱ्याची वाट पाहू लागते ..

आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते.. Air Force मध्ये मन वाहून नेते.. हवाई दलाच्या अन अद्वितीय Avionics च्या पुन्हा एकदा प्रेमात पाडते..