आज मुद्दामून वेळ काढून लिहितोय … अलीकडची देशातली परिस्थिती पाहता मुद्दामून बोलावस वाटलं या विषयावर…
देशभक्ती या विषयावर बऱ्याच भावनिक चर्चा झडतात...
काही दिवसांपूर्वी काही जण बोलत होते की, " यार आपण भारत देशात का जन्माला आलो..! " महागाई, भ्रष्टाचार, रोजगाराचे प्रश्न आणि मुख्य आणि सध्याचा गाजणारा मुद्धा म्हणजेच पाकिस्तानी कुरापती आणि सरकारची मुग गिळणारी ग्लोबल डिप्लोमेसी.
एक पोस्ट असा होता की, " आपल्याला यंदाचा स्वातंत्र्य दीन आपण न साजरा करता, त्याचा निषेध केला पाहिजे." फार निराशावादी पोस्ट होता तो आणि त्या ही पेक्षा बेजवाबदार आणि अविचारी.
"भारत माझा देश आहे" ही प्रतिज्ञा आपल्याला काय शिकवते ? जे काही घडतय त्याचा आपणही भाग आहोत हे आपण कधी समजणार ?
देशात बरेच प्रश्न आ वासून उभे आहेत हे मान्य, पण …
तो सन्मान हा राष्ट्राचा आणि राष्ट्रध्वजाचा असतो... तो सन्मान हा देशातल्या शेतकऱ्यांचा असतो … तो सन्मान हा देशाच्या शास्त्रज्ञांचा असतो … तो सन्मान हा देशातल्या करदात्या श्रमिकांचा असतो … तो सन्मान हा देशाच्या शूरवीर बहाद्दुरांचा असतो… तो सन्मान हा देशातल्या वीरमाता आणि भगिनींचा असतो… तो सन्मान देशाच्या संस्कृतीचा असतो … तो सन्मान हा विविधातेतल्या एकतेचा असतो… आपण आपण देशाच्या प्रगतीचा भाग आहोत याचा तो स्वाभिमान असतो... तो सन्मान राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या पंतप्रधान पदाचा असतो…
राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या पंतप्रधान पदावर विराजमान व्यक्ती कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हा वेगळा भाग.
स्वातंत्र्य दीन साजरा करणे म्हणजे झेंडा वंदन करणे इतकेच नव्हे … तर आपल्याला एक दूरगामी परिणाम करणारी Positive Energy आणि देशाला .प्रगतीपथावर नेण्याची प्रेरणा मिळते.
आणि अजून एक गोष्ट अशी की, काहीजण भावनेच्या भरात पाकिस्तान बद्दल चुकीचे बोलताना आढळतात, पाकिस्तानचा राष्ट्रध्वज हा सुद्धा त्यांचा स्वाभिमान आहे. आपला स्वतःचा स्वाभिमान बाळगणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु
स्वतःचा स्वाभिमान बाळगताना, दुसऱ्याचा अपमान करणे आपल्याला शोभत नाही आणि आपली संस्कृती सुद्धा ते शिकवत नाही.
असो मी फार काही बोलत नाही आपण सर्व सुज्ञ आहोत …
चल तर मग, स्वातंत्र्य दिना निमित्त एकत्र येऊ आणि आपल्यात एक नवचेतना निर्माण करू.
जय भारत … !!!