बरेच दिवस काही लिहिले नव्हते, सुचत असूनही वेळेने बांधून ठेवले होते. आज खूप दिवसांनी रोमांच पुल्लंकित भावना व्यक्त कराविशी वाटली.
घरच्यांच्या तोंडाला
फेस आणणारे फेसबुक आणि फेसबुक मधली मित्रमंडळी, या पलीकडे जाऊन आपलीशी
बनतात तर कधी कारण नसताना जवळची वाटतात.
खर तर कारणहीतसेच आहेच
कदाचित; IAF (Indian Air Force) च्या एका Page वर ओळख झालेला मित्र शुभम.
राहणारा दिल्लीचा. त्यामुळे फार कधी बोलणे झाले नाही पण, त्याची आवड आणि
IAF ची करिअर म्हणून निवड यामुळे मैत्री वाढली. आज त्याच फेसबुकच स्टेटस
पाहून खूप आनंद झाला. आज तो IAF मध्ये -Cadet Shubham Tiwari म्हणून जॉइन झालाय. एखाद्याने स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण होताना पाहून खूप आनंद होतो.
शुभम
च्या निमित्ताने असेच काहीस वाटतय. जणू स्वत:च स्वप्न पूर्ण होतय. कदाचित
खोट वाटेल पण, वर म्हटल्या प्रमाणे त्याला Best Of Luck ची Commnet
करताना रोमांच पुल्लाकीत झाले !! अचानक शहरे आलेले जाणवले. !!
नभ:
स्पर्श दीप्तम: म्हणजेच Touch The Sky With Glory !! याचा खरा अर्थ
अनुभवणे कसे असेल या कल्पनेतच मन Mach-२ च्या वेगाने कोटीच्या कोटी उड्डाण भरू लागते.
कॅडेट शुभम तिवारीला हार्दिक शुभेच्छा !!