Saturday, 26 January 2013

" फक्त भारतवासी "


ए मेरे वतन के लोगो  .. तुम खूब लगा लो नारा ..
ये शुभ दिन है सबका .. लेहेरालों तिरंगा प्यारा .. 

पर मत भूलो सीमा पर .. विरोने है प्राण गवाए ..
कुछ याद उन्हें भी कर लो .. जो लौट के घर ना आए ..

कोई सिख कोई जाट मराठा .. कोई गोरखा कोई मद्रासी ..
सरहद पर मरनेवाला हर वीर था भारतवासी ..

मित्रांनो .. या गीतामध्ये Indian किंवा हिंदुस्तानी तत्सम शब्दप्रयोग न करता " फक्त भारतवासी " असे शब्द वापरले आहेत बर का .. जात-धर्म-पंथ ह्या धारणा फक्त आपल्याच असतात.. सीमेवरील सैनिक असा विचार करायला लागेल मग झाले...  सैनिक तर सगळे एकमेकांसाठी जगत असतात; त्यांच्यासाठी फक्त "भारतवासी " हा एकच धर्म - एकच जात ... 

आपली आणि आपल्या नातेवाईकांची इच्छा असते की, आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणेच अंत विधी झाले पाहिजेत आणि सैनिकांची एकच  इच्छा तिरंग्यात लपेटून सलामी - ए शस्त्र अशा इतमामात अंतिम संस्कार ... !!

आपण काही गोष्टींची कल्पना पण करू शकत नाही, कोणत्या गोळीवर आपले नाव लिहिले असेल ?? आपण फक्त पुतळे आणि स्मारक बांधण्यात आणि त्यासाठी जागा शोधण्यात स्वतःची आणि पर्यायाने देशाची वेळ, शक्ती, यंत्रणा सगळेच फुकट घालवतो. सैनिकांची कुटुंबे ??? त्यांना एक वीरता पदक असलेला कागद दिला जातो ..!!

आज आपण ६४ वा प्रजासत्ताक दिन साजरी करतोय; आज ६४ वर्षानंतर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते सर्व यश -अपयश सर्व गोष्टींस आपण पूर्णपणे जवाबदार आहोत..  आज आपली दूरदृष्टी  कुठपर्यंत आहे ?? भविष्यात कुठपर्यंत आपण पाहू शकतोय?

सगळे मला विचारतात, काय रे तू काय आर्मी मध्ये आहेस का, इतके सगळे आर्मी बद्दल FB वर Share करतो? पण खरे सांगू तर.... त्यांची शिस्त, जीवनपद्धती, एकीची भावना, कोणत्याही परिस्थिती मध्ये ... तक्रार न करता... आपले कर्तव्य करत रहाणे अजिबातच सोपे नाहीये, शौर्य-त्याग-अद्द्वितीय DRDO या सगळ्या गोष्टींचा एक जबरदस्त मिलाफ आपल्याला संरक्षण दलात पाहायला मिळतो आणि तो सुद्धा National & Global Diplomacy सांभाळून.

सीमेवर मायनस डिग्री मध्ये २४ तास खडा पहारा देणारी आर्मी , आणि महिनोंमहिने समुद्राच्या लाटांशी आणि समुद्र तळाशी पहारा देणारी नेव्ही, आणि आपण रात्री झोपलो असताना आणि डिस्को -पब मध्ये बेधुंध असताना, हजारो फुटावरून घिरट्या घालणाऱ्या एअर फोर्स चे पायलट दक्ष पणे आपल्या शहराचे आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांचा हा दिवस, तसेच शूर आणि कर्तव्यदक्ष नागरिकांचा सन्मान आणि संस्कृती आणि तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा गौरव करण्याचा हा दिवस.

तसं पाहायला गेलं तर, काल National Voters Day होता, पण कदाचितलोकांना हे माहित असेल, तसेच भारत -चीन युद्धाच्या दोन महिन्यानंतर  २६ जानेवारी १९६३या दिवशी लता दिदींनी रामलीला मैदानात हे गाणे पहिल्यांदा गायले होते आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सकट समस्त प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

पण आज नक्कीच बोलावेसे वाटते,  जय जवान- जय किसान - जय विज्ञान - जय भारत !!!

शं नौ वरुण: (घोष वाक्य: भारतीय नौदल)
शस्त्रातून शक्ति   (घोष वाक्य: भारतीय पायदळ)
नभं स्पर्श दीप्तम  (घोष वाक्य: भारतीय हवाईदल)


No comments:

Post a Comment