Saturday, 17 March 2018

।। पडघम गिरगाव गुढीपाडव्याचे ।।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

घालू फेटा अभिमानाचा अन वैभवाचा ।
परिधान करू कुर्ता परंपरेचा अन एकोप्याचा ।

नेसू साडी नऊवारी कर्तृत्वाची अन पराक्रमाची ।
लेऊन शृंगार ममतेचा अन समतेचा ।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

सजवू भगवे ध्वज हिंदुत्वाचे अन शौर्याचे ।
सजवू अब्दागिर नेतृत्वाचे अन स्फुल्लिंगचे ।

सुशोभित गिरगाव आपुले रांगोळीने अन संगीताने।
लावून तोरणे झेंडूची ही स्वागताची अन समृद्धी ची।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।


चढवू पाने ढोलची सर्वसमर्पित शक्तीने अन ताकतीने ।
असतील ताशे सोबतीला अन टोल ही दुमदुमून जातील नाद हे आसमंतीचे ।

निसर्ग होई प्रसन्न सारा वासुदेवाच्या टाळाने अन चिपळीने ।
स्फुरण चढते तुतारी अन शंख ध्वनीने ।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

चला करू बुलेट वारी नेसून नऊवारी अन वाढते धडधड हृदयाची अन आसमंताची ।

छोटे शिवबा अन छोट्या झाशीच्या राणी असतील कौतुक सोहळे ।
पडेल पाऊल पुढचे सुदृढ भविष्याचे अन नेतृत्वाचे।

चला उभारू गुढी चैतन्याची अन नवं निश्चयाची ।

चित्ररथ अन युद्धकौशल्याच्या सोबतीला असतील मल्लखांबाची प्रात्यक्षिके ।
वैभवशाली परंपरेची प्रदर्शन घडते  वैभवसंपन्न गणेशमूर्तीच्या साक्षीने ।

फडके गणपती पासून सुरू होतो सोहळा आनंदाचा अन नववर्षाचा ।
पोलीस अन व्यवस्थेच्या समन्वयाने आनंद द्विगुणित होतो आप्तजनांचा ।

No comments:

Post a Comment