आयुष्यात पुन्हा एकदा मन
बोलू पहाते "नभ: स्पर्श
दीप्तम" (आयुष्यात एकदा तरी ... भाग २)
आयुष्यात पुन्हा परत लहर
संचारते .. Air Force मध्ये मन वाहून
नेते..
हवाई दलाच्या अन
अद्वितीय Avionics च्या पुन्हा एकदा
प्रेमात पाडते..
आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. KC-130 मध्ये बसून... तहानलेल्या जेट्स ची तहान भागवू पहाते..
F-16ची 450 Gallons ची Fuel Tank फक्त 30 सेकंदात Air -To -Air Refueling चा थरार अनुभवू पहाते ..
अन 24 तास उडत राहण्याची क्षमता विमानाला बहाल करू पहाते ..
आयुष्यात पुन्हा परत लहर
संचारते .. C-17 मध्ये बसू पहाते
..
170,900 lbs च्या Payload सकट आकाशात भरारी
घेऊ पहाते..
आणि आपल्या Landing Gear वर विश्वास टाकून तितक्याच वजनासकट जमिनीवर उतरू पहाते ..
आणि आपल्या Landing Gear वर विश्वास टाकून तितक्याच वजनासकट जमिनीवर उतरू पहाते ..
आयुष्यात पुन्हा परत लहर
संचारते .. AWACS मधल्या RADAR Panel वर स्थिरावू पहाते
...
शत्रूच्या प्रदेशात शेकडो मैलांवरून घारीपेक्षा तीक्ष्ण नजरेने
लक्ष ठेवणारी कार्य प्रणाली अनुभवू पहाते ..
आपल्या Defense System ला शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती पुरवू पहाते ..
आपल्या Defense System ला शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती पुरवू पहाते ..
आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते .. B-2किंवा F-117 मध्ये बसू पहाते .. अगदीच नाही तर B-52 मधून भरारी घेऊ पहाते..
F-117 मधून Stealth Operations करताना शत्रूच्या RADAR ला तुरी देऊ पहाते ..
B-2 आणि B-52 मधून Stealth Carpet Bombing करून शत्रूची दाणादाण उडवू पहाते ..
आयुष्यात पुन्हा परत लहर
संचारते .. Lockheed C-5 Galaxy आणि Airbus Beluga च्या Cockpit मध्ये जाऊन बसते..
A-380 चा संपूर्ण Fuselage आपल्या पोटात
सामावून घेणाऱ्या ह्या उडणाऱ्या हत्तीचे
Pilot रूपी
माहूत बनू लागते..
47 Ton लोड करून वाऱ्याशी स्पर्धा करण्यासाठी Beluga च्या Cockpit मध्ये ATC चा Takeoff च्या इशाऱ्याची वाट पाहू लागते ..
आयुष्यात पुन्हा परत लहर संचारते.. Air Force मध्ये मन वाहून नेते.. हवाई दलाच्या अन अद्वितीय Avionics च्या पुन्हा एकदा प्रेमात पाडते..
No comments:
Post a Comment